सेलू शहरात दामिनी पथकाची नियुक्ती रोडरोमिओना आळा बसणार
सेलू शहरात दामिनी पथकाची नियुक्ती रोडरोमिओना आळा बसणार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सूरज शहाणे, सेलू : सेलू शहरात एका अल्पवयीन मुलीवर घडलेला अत्याचार प्रकरणाच्या पार्शवभूमीवर सेलू पोलीस स्टेशनचे पोलीसउपनिरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी शहरात बुधवारी 14सप्टेंबर पासून दामिनी पथक नियुक्त केले आहे.महिलां व शाळकरी मुली यांना रोड रोमिओ चा त्रास होऊनये तसेंच सेलू शहरात घडलेल्या अत्याचार प्रकरणी पुनरावृती होऊ नये,
तसेच गुन्हेगारिलाआळा बसावा याकरिता या पथकाची स्थापना करण्यात आली असून ज्या महिला भगिनी युवतीना रोड रोमिओचा त्रास होत असेल त्यांनी त्वरित या पथकातील अधिकाऱ्याशी संपर्क साधावा जेणेकरून अश्या समाजवीघातक इसमांचा पोलिसांना बंदोबस्त करणे सोयीस्कर होईल.त्यासाठी दक्ष नागरिकांनी हि दामिनी पथकास त्वरित संपर्क साधावा असे आव्हान सेलू पोलीस प्रशासना द्वारे करण्यात आले आहे.
दरम्यान नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी मो.9359428441 पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौरे, पोलीस हवालदार सरिता कड पोलीस नाईक राहुल मोरे पोलीस शिपाई संजय सानप पोलीस शिपाई सुनीता व्यवहारे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सेलू पोलीस प्रशासना द्वारे करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत