अजय रेडी यांची( DRUCC ) डी. आर. यु. सी. सी दक्षिण मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड
अजय रेडी यांची( DRUCC ) डी. आर. यु. सी. सी दक्षिण मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : विरूर स्टेशन हे गाव महाराष्ट्रात असून रेल्वे सीमांकन मध्ये साउथ सेंट्रल मध्ये येतो या कारणामुळे विरुर स्टेशन या गावाला रेल्वे कडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही सुविधा योजना मिळत नाही व आपल्या विभागातील प्रश्न रेल्वे महाप्रबंधक यांचे कडे मांडायचे असल्यास वारंवार मा. खासदाराचे शिफारस पत्र घेऊन रेल्वे महाप्रबंधक यांना भेटावं लागत होते.
या सर्व बाबी लक्षात घेता मा. खासदार साहेब बाळूभाऊ धानोरकर यांनी अजय रेड्डी यांच्या नावाची शिफारस करून (DRUCC)डी. आर. यु. सी. सी मध्ये विभागातील कोणतीही समस्या सोडवण्या करिता मा. महाप्रबंधक (रेल्वे) यांच्या मीटिंग मध्ये आपल्या विभागातील विषयावर चर्चा करतील या करिता निवड करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्याना सूचना दिल्या.
तात्काळ विरुर स्टेशन येथील अजय रेड्डी यांची निवड करण्यात आली आता साउथ सेंट्रल मा.रेल्वे महाप्रबंधक हैद्राबाद यांच्या मीटिंगमध्ये आपल्या ग्रामीण भागातील समस्या सोडवण्या करिता अजय रेड्डी यांना पहावयास मिळणार आहे सध्या स्थिती पाहता,
विरुर स्टेशन येथे बहुतेक गाड्यांचा थांबाच नसल्याने गावकऱ्यांना ये- जा करण्या करिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच कोविड-19 मध्ये बंद झालेल्या गाड्या असतील असे विविध प्रश्न विभागात मांडताना दिसतील व विभागातील समस्या सोडवतील अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत