मांजऱ्या सापाला दिले जीवनदान.
मांजऱ्या सापाला दिले जीवनदान.
- निमविषारी असणारा हा दुर्मिळ साप.
- नेफडो च्या वन्यजीव संवर्धन समितीचे उत्कृष्ट कार्य.
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,लोकेश पारखी, राजुरा : राजुरा येथील रमाबाई नगर मधिल राजू शेरखी यांच्या घरासमोरील टिन शेड मधे साप असल्याची माहिती आदित्य धोटे व हसन खान यांना मिळाली त्यांनी साप कसा बसा पकडला. पण सापाची माहिती नसल्यामुळे हा साप कोणता हा प्रश्न येताच त्यांनी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वन्यजीव संवर्धन समितीचे सर्पमित्र विजय पचारे यांच्याशी संपर्क करुन सापाची योग्य माहिती व मार्गदर्शन घेतले.
साप सर्पमित्र च्या ताब्यात दिले आपल्या परिसरात खुप कमी प्रणामानात आढ़ळनारा साप फॉस्टन कॅट स्नेक मराठी नाव मांजऱ्या साप निमविषारी असतो. या सापाच्या प्रजाती मधे दोन रंग असतात. राखड़ी, लालसर राखड़ी रंग. याआधी सुमठाना येते रेस्क्यू केला आणि राजुरा येथील रमाबाई नगर येथे हा लालसर साप पकडला.
विशेष म्हणजे हा साप झाड़ावर यांचे अधीवास असून तो मनुष्याच्या संपर्क मधे खुप कमी येतो. वन्यजीव संवर्धन समितीचे सर्पमित्र विजय पचारे व अमर पचारे यांनी राजुरा वनविभाग येथे सापाची नोंद करुन त्याला निसर्गमुक्त करण्यात आले. साप मारण्या ऐवजी त्याला वाचविण्यात खरा आनंद असतो अशी प्रतिक्रिया विजय व अमर पचारे यांनी यावेळी दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत