Breaking News

पारनेर नगरपंचायतीचेच नगरसेवक बनले ठेकेदार

 पारनेर नगरपंचायतीचेच नगरसेवक बनले ठेकेदार

महा घडामोडी न्युज कार्यकारी संपादक, दत्ता ठूबे, अहमदनगर : पारनेर नगरपंचायत मध्ये सध्या प्रचंड प्रमाणात घोटाळा सुरू असून यामध्ये स्वतः नगरसेवक अडकलेले आहेत, याला कारणीभूत स्वतः प्रशासन असून यांना लवकरच याचा प्रत्यय येईल.

       पारनेर नगरपंचायतचा बाजार पावतीचा ठेका स्थानिक नगरसेवकांनी घेतलेला असून त्याचा ठेकेदार वेगळाच आहे त्या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी ग्रामस्थांची मागणी आहे. तरी या ठेकेदाराविषयी योग्य ती कारवाई करून पुन्हा निविदा काढाव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत