Breaking News

सामाजिक सभागृह यांच्या नामकरनास समाजा समाजात वाद

 निर्णयास न्यायालयात धाव निर्णय मात्र लांबीवरच

ग्राम पंचायत बोर्ड दीक्षित येथील घटना

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गणेश परचाके, पोंभूर्णा : तालुक्यातील बोर्ड दीक्षित येथे समाजासाठी २५/१५ इतर ग्रामीण विकास या निधीतून २०१७.१८ या कालावधीत गाववासीयांना सामाजिक सभागृहाची निधी एकूण ७. लक्ष मिळाली असता सामाजिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले मागासवर्गीय गावातील कुटुंबाचा सोयी सुविधा व्हावे अथवा गावातील तसेच वैयक्तिक कोणतेही कार्यक्रम पार पाडण्या करिता सामाजिक सभागृह देण्यात आले. 

सामाजिक सभागृह बनून दोन वर्ष लोटली तरीही सामाजिक सभागृह हे सामाजिक सभागृह या नावानेच ओळखल्या जात होते.काहीच कारण नसताना सामाजिक सभागृहाला मा.सा कन्नमवार माजी मुख्यमंत्री हे नाव ग्रामपंचायत मासिक सभा ठराव क्रमांक.१०/१ दिनांक २५.११.२०१९ ला ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.व नाव देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना ठराव पाठवण्याकरिता मौजा बोर्ड दीक्षित येथील श्री केशव नारायण गेलकीवार यांना दिनांक २८.२.२०२० ला ग्रामपंचायत मधून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याकरिता निघाले.परंतु वरिष्ठ कार्यालयातून कोणतेही पत्र व सूचना दिलेली नाही.

 तरीपण श्री केशव नारायण गेलकीवार यांनी ग्रामपंचायतला पूर्वसूचना न देता.८.१.२०२१. ला स्वतःच्या स्वखर्चातून नाव लिहिले व समाजाला मान्य नाही.त्यामुळे दोन समाजामध्ये रोष निर्माण वाद झाले.सदर वादावर चर्चा करीना करीता ग्रामपंचायत बोर्ड बोरकर येथे दिनांक.११.१.२०२१ रोज सोमवारला दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीची प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. दोन्ही समाजाकडून चार प्रतिनिधी हजर होते.त्यामध्ये ग्रामपंचायत कमिटी सुद्धा हजर होती.चर्चा करण्यात आली. चर्चेमध्येअसे ठरविले की सामाजिक सभागृह बोर्ड दीक्षित येथील नाव मा .सा कन्नमवार माजी मुख्यमंत्री सभागृहावरून कमी करून त्याऐवजी सामाजिक सभागृह बोर्डा दीक्षित असे नाव देण्याचे दोन्ही समाजाने मान्य केले.

त्यानंतर सदर चर्चा अति असे ठरवले की दुसऱ्या सभागृहाचे पूर्ण बांधकाम झाल्यानंतर व ग्रामपंचायत कडे आल्यानंतर दोन्ही सभागृहाचे नामांकरण करण्याचे चर्चा केली. त्यावेळी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यांनी गावातील सभा घेऊन निर्णय घेण्या यावी यावेळी दोन्ही समाज ते ठरवले.त्यानुसार निर्णय घेण्यात येतील त्यावर दोन्ही समाज राजे झाले. व मान्य केले व सभागृहावरून निर्माण झालेल्या वाद दोन्ही समाजानी एकत्र मिळून वाद निपटारा करण्यात आले. व सामाजिक सभागृह नाव राहावे असे सर्वांनी मान्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत