परभणीच्या पालकमंत्री पदी तानाजी सावंत
परभणीच्या पालकमंत्री पदी तानाजी सावंत
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : भारतीय जनता पक्षाच्याच मंत्र्याकडे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद बहाल केले जाईल असा सुर उमटत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्हानीहाय नवीन पालकमंत्र्याची यादी जाहीर करते वेळी परभणी जिल्ह्याचे पालकत्त्व धाराशिव चे तानाजी सावत यांच्याकडे सुपूर्त करीत भाजपासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळास धका दिला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने परभणीतील स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहानाच्या मुख्य सोहळ्यास राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे हे हजर होते.त्या पाठोपाठ मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने 17 सप्टेंबर हेच पुन्हा ध्वजारोहानाच्या कार्यक्रमाकरिता परभणीत दाखल झाले होते.
या दोन्ही सोहळ्यातील सावे यांच्या हजेरीने भारतीय जनता पक्षाच्या महानगरासह जिल्ह्यातील कार्यकर्ते कमालीचे सुखावले होते.परभणी जिल्ह्यास यावेळी सावे यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचाच पालक मंत्री लाभेल असा दृढविश्वास व्यक्त करीत भाजपचे नेते कार्यकर्ते पालकमंत्री पदाच्या नियुक्ताकडे लक्ष ठेऊन होते.( दि.24) सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत