हत्तीच्या कळपाने केले अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
हत्तीच्या कळपाने केले अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे,अर्जुनी मोर : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेला 23 हत्तींचा कळप गाढवी नदीच्या तीरावर वसलेल्या खोडदा गावात गेल्या दोन दिवसांपासून वावरत होता महागाव शेतशिवारात या हत्तीच्या कडपाणी प्रवेश करून महागाव येथील काही शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान केले दिनांक 24 सप्टेंबर च्या रात्री महागाव शेतशिवारातून या हत्तीच्या कडपाने येगाव खामकुरा गावाकडे प्रस्थान केले त्यामध्ये येगाव येथील काही शेतकऱ्यांचे धान पिकाचे सुद्धा नुकसान केले.
खामकुरा व येगाव येथील शेतकरी बांधवांनी रात्रीच्या वेळी गस्त केल्याने हा हत्तीचा कळप पुन्हा खोडदा गावाकडे प्रस्थान झाल्याचे समजली आहे हत्तींच्या या आगमनाने अर्जुनी मोर तालुक्यात दहशतीचे वातावरण असून वन विभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे गेल्या दोन दिवसाआधी अरुण नगर येथील विनय मंडळ याचा वाघाने फडशा पडला.
त्यातच तोंडाशी आलेला धान पीक हत्तीचा कळप उध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा झालेला आहे संदर्भाने प्रस्तुत प्रतिनिधीने अर्जुनी मोर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी श्री खोब्रागडे यांच्याशी भ्रमण ध्वनी वरून संपर्क साधला असता हत्तीच्या कडपामुळे या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेले आहे त्यांना वन विभाग नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती दिली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत