नांदा ग्रामपंचायतीवर भाजपा शेतकरी संघटना मनसे गोंडवाना युतीचा झेंडा
नांदा ग्रामपंचायतीवर भाजपा शेतकरी संघटना मनसे गोंडवाना युतीचा झेंडा
काँग्रेसला बालेकिल्ल्यात खातेही खोलता आले नाही
ग्राम विकास आघाडी चे सरपंच पदी मेघा नरेश पेंदोर निवडुन आले
काँग्रेस चे माजी ग्राम पंचायत सदस्य अभय मुनोत यांचा दारुण पराभव
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नांदा फाटा : कोरपणा तालुक्यातील सर्वात मोठी कारखान्यांनी वेढलेली गर्भश्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली, नांदा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये 17 पैकी 15 जागेवर विजय प्राप्त करत, ग्राम विकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले. नांदा येथील जुन्या वस्तीत प्रभाग क्रमांक एक दोन व तीन मध्ये इथे आत्तापर्यंत इतर पक्षांना व आघाडीला एक उमेदवार निवडून आणणे कठीण होते. या प्रभागांमध्ये ग्राम विकास आघाडीने चक्क कमाल दाखवत, सरपंचासह नऊ उमेदवार निवडून आणले.
मागील पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ग्रामविकास आघाडीचीच सत्ता होती. या आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाच वर्षाच्या काळामध्ये केलेला, भूतो न भविष्यती विकास गावा मध्ये आलेले सार्वजनिक सामान्य रुग्णालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते गावाचे सुशोभीकरण, गावातील शिक्षणाचा सुधारलेला दर्जा, विद्युत व्यवस्था गटार व सांडपाण्याची व्यवस्था, सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था, अशा विविधांगी विकास कामामुळे मतदारांनी ग्रामविकास आघाडीला कौल दिला असावा, ही शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे नांदा फाटा या परिसरात प्रभाग क्रमांक चार पाच व सहा मध्ये दोन उमेदवार वगळता, इतर सर्व उमेदवार ग्राम विकास आघाडीचेच विजयी झाल्याने, काँग्रेस समर्थित उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रभाग क्रमांक चार मध्ये आशाताई खासरे व प्रभाग क्रमांक पाच मध्ये सुप्रियाताई काळे यांनाच केवळ आपली उमेदवारी राखता आली. मात्र काँग्रेस समर्थित एकाही पुरुष उमेदवाराला निवडणुकीच्या रणधुमाळीत मध्ये आपली जागा कायम राखता न आल्यामुळे, पक्षांतर्गत राजकीय वातावरण गढूळ झाले असून, विविध प्रभागांमध्ये राजकीय असलेले वर्चस्व का कायम राखता आले नाही ? याचीही कारणमिमांसा होणे तेवढेच गरजेचे असून, जनतेने पूर्ण मताधिक्याने दिलेला कौल ग्राम विकास आघाडी विकासाच्या स्वरूपामध्ये कसा अस्तित्वात आणते, हे पुढील पाच वर्षात दिसून येणार आहे.
विजयी उमेदवारांमध्ये अनुसूचित जमाती महिला व पुरुष गटामध्ये मंगेश दौलत धुर्वे ,सुषमा कोसा धुर्वे ,बबन मळावी ,सुनिता महादेव आत्राम ,अश्विनी पुरुषोत्तम मळावी ,संजय वैताग कोवे ,मंगला बंडू गायकवाड, मेघराज गोविंदा मडावी , संगीता निलेश ढोणे यांचा समावेश असून अनुसूचित जाती महिला पुरुष गटामध्ये कैलाश मनोहर डाखरे ,जयऱ्यी कैलास ताकसांडे, चंद्रहास चंद्रप्रकाश बोरकर यांचा समावेश असून, सर्वसामान्य पुरुष गटातून अतिशय चुरशीच्या लढतीत उभे असलेले, प्रभाग क्रमांक 3 मधून रत्नाकर भास्कर चटप व प्रभाग क्रमांक 5 मधून माजी उपसरपंच पुरुषोत्तम आत्माराम आस्वले वरील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहे.
ग्राम विकास आघाडीच्या सर्व विजय उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संजयराव मुसळे ,शेतकरी संघटनेचे मुरलीधर बोडके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भास्कर लबडे ,अनिल मुसळे , गोंडवाना पक्षाचे प्रवीण कुरसंगे यांच्यासमवेत सुरेश धोटे, जगजीवन शंभरकर ,चांगदेव बोडके, श्यामराव आत्राम ,मनोर झाडे ,लहुजी गोंडे, रवींद्र चिंचोलकर ,राहुल पाचभाई ,योगेश मुळे ,निमसरकार विविध नेते व कार्यकर्ता मंडळींनी मोलाचे परिश्रम केले.
ग्राम विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार संजय धोटे ,सुदर्शन निमकर, सतिश ऊपलेचीवार,निलेश ताजने ,शेतकरी संघटनेचे माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप ,नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या अनेक कॉर्नर सभा झाल्या मात्र काँग्रेस समर्थीत उमेदवारांच्या प्रचारार्थ विद्यमान आमदार किंवा निर्वाचन क्षेत्रातील नेतेमंडळी फिरकले सुद्धा नाही याचीसुद्धा कारणमीमांसा होणे गरजेचे आहे अशी चर्चा आता मध्ये जोर धरू लागलेली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत