दीपक चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप
दीपक चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप
विरुर स्टेशन येथील रुग्णालय, सुबई अंगणवाडी केंद्र येथे केले फळवाटप
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सुभाष अलगमकर, राजुरा : वाढदिवस म्हटले की केक, पार्टी फिरायला जाणे असे आजच्या तरुणाईचे समीकरण असते, पण या अनावश्यक गोष्टीना वाव न देता सुबई येथील युवा सामाजिक कार्यकर्ता तसेच फुलाजी बाबा ध्यान केंद्रचे कोषाध्यक्ष दीपक चौधरी यांनी दि 18 ऑक्टोबर रोजी आपल्या 30 व्या वाढदिवसानिमित्य गोरगरीब रूग्णांना व गरजूंना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार सुबई येथून पाच किमी अंतरावर असलेल्या विरुर स्टेशन येथील आशाधाम हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल असलेल्या 15 रुग्णांना केळी, संत्रा, सेफ वाटप करण्यात आले. तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फळ वाटप केले, त्यानंतर सुबई येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलांना त्यांच्यातर्फे फळाचे वाटप करण्यात आले.
त्यांनी हा उपक्रम आजच्या दुष्काळी जीवनात गरिबांना कोणाची ना कोणाची मदतीची गरज असते. या भावनेतून मागील पाच वर्षांपासून मदतीच्या भावनेतून राबवित असून, यामुळे मला खूप आनंद मिळतो, अशी भावना व्यक्त केली, यावेळी त्यांचे स्नेही प्रदीप बोटपल्ले, अनिल कुरवटकर, शंकर सत्रे, संतोष चौधरी, अक्षय अंगलवार, बंडू येलमुले, रुपेश पुडके, शुभम चौधरी, भुषण चापले, आकाश राचर्लावार इत्यादी त्यांचे सोबत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत