Breaking News

वाचनाने मानवाच्या जिवनात सकारात्मक बदल घडत असतो : सौ.अरुणा संगेवार

 वाचनाने मानवाच्या जिवनात सकारात्मक बदल घडत असतो : सौ.अरुणा संगेवार

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : शहरातील श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशाला स्व:सौ.दूर्गाताई द.कूलकर्णी स्मृती ग्रथांलय सेलू कडून भारताचे महान शाञ्यज्ञ, मा.राष्र्टपती,भारतरत्न, डाँ.ए.पि.जे.अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला या वेळी प्रमूख ऊपजिल्हा अधिकारी अरूणा संगेवार, अल्का कोरडे, विलास कोरडे यांची ऊपस्थीती होती, 

या वेळी वाचनाने व्यक्तीच्या आत्मविश्र्वास वाढतो , सर्वांगीन विकास होतो, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, म्हणजेच वाचनाने मानवाच्या जिवनात सकात्मक बदल होण्यास मदत होते असे प्रतिपादन मा.अरूणा संगेवार व सौ.अलका कोरडे यांनी केले.व्यासपिठावरती नू.वी.शि. संस्थेचे सचिव डाँ.व्ही.के.कोठेकर, उपजिल्हा.अधिकारी अरूणा संगेवार,कुलस्वामिनी प्रतिष्ठान औरगाबादचे अध्यक्ष,तथा संचालक विलासजी कोरडे, सौ.अलका कोरडे, संगिता खराबे, दत्तराव घोगरे, रविदास मोगल, सतीश जाधव सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची ऊपस्थीती होती.

कार्यक्रमाची सूरूवात प्रतिमा पूजनाने व पूजा महाजन यांच्या स्वागत गिताने झाली, या निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते.मान्यावरांच्या हस्ते त्याचे उदघाट्न करण्यात आले.त्याच बरोबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त "इवलेसे वेल वाचनाचे-वाढवू फुलू संस्काराचे" या उपक्रमात अग्निपंख या पुस्तकावर अतिशय सुंदर असे समीक्षात्माक विवेचन सादर केल्या बद्धल कोरडे यांनी कु.प्रतीक्षा मोगल, कु.उन्नती भोसीकर या विद्यार्थिनींना रोख रु.500/-प्रत्यक्ती देऊन त्यांचं कौतुक केले. त्याच बरोबर त्यांनी रु.2500/- ग्रंथ खरेदी साठी देणगी दिली.

 संस्थेतील अनेक ग्रंथप्रेमी,वाचन प्रिय सहकारी बन्धु-भगिनिनि प्रशालेच्या स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयास ग्रंथ भेट व नगदी रक्कम दिली, त्याबद्धल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. देणगीदारांची यादी वाचन श्री.कैलास मलवडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रथंपाल शिवाजी शिंदे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सौ.वैशाली चव्हाण यांनी केला.सर्व मान्यवरांनी वाचनाचे महत्व विषद करून सांगितले,कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री व्ही.के.कोठेकर यांनी पुस्तके केवळ वाचू नयेत तर ते प्रत्येक्षात आयुष्यात उतरावीत असे प्रतिपादन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.कीर्ती राऊत यांनी केले तर आभार भालचंद्र गाजांपूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सुहास देऊळगावकर,अनंत बोराडे,आदी शिक्षक -शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत