Breaking News

फुगवू नका रे छाती

 


 फुगवू नका रे छाती


आता तुम्हीच यांना शिकवारे 

     एका ठिकानी यांना बसवारे ....!!


ऐकिचे सुटुध्या आता इथेच वारे,

संघटना तुमची असी बनवारे,

शब्द भिमाचे ध्यानी ठेवारे,

खंबीर नेता, गौतम बनवारे ...!!


भिमाच नावाने, फुगवून नकारे छाती,

बहुजनानो घ्यारे, सत्ता ही तुमच्या हाती ....!!


सांगुन गेले बाबा, मनुवादी ओकखून डाव, 

लई दुःखाचे साहिलेत, दु:खाचे धुतले घाव, 

जुळवा तुम्हीच आता, भीम रक्ताची रे नाती ....!!


स्वार्थाच्यासाठी सारे, फिरतात खुर्चीसाठी,

आपआपले गान्हाने, सांगत फिरतो वाटी, 

 लाज शरम सोडून, कुठेच नाही भीती ....!!


बाला झालेत बेहिमानी, दु:ख जानेना कोनी,

नका राहुरे पैशावरी, गौतम दावरे रक्तच पाणी, 

प्रमाची जुळवा नाती, ओळखा समता शांती ....!!


लोककवी, पत्रकार : गौतम धोटे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत