संघ मुख्यालयावर धडकणार बहुजनांचा मोर्चा
संघ मुख्यालयावर धडकणार बहुजनांचा मोर्चा
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,अश्र्वजीत हुमने,ब्रम्हपुरी : देशातील लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता ते वाचवण्यासाठी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संघ मुख्यालयावर बहुजनांचा मोर्चा धडकणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी 2 लाखाच्या संख्येने बहुजन आरएसएस मुख्यालयाला भेट देतील. त्यापूर्वी बेझनबागमध्ये सभा होणार आहे. नंतर अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघेल. याबाबत माहिती देताना खरात म्हणाले की, सध्याच्या सरकारच्या माध्यमातून जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे.
अशाप्रकारे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत आहे, आरएसएस मागून निर्बंध लादणारे सरकार चालवत आहे. या विरोधात डीएनएन कौन्सिलने ६ ऑक्टोबर रोजी हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा करून भाई सत्तेत येत असल्याचे ते म्हणाले. व्ही.सह निवडणुकीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायमूर्तींनी आदेश दिल्यानंतर पार पडली. या मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हाहन करण्यात येत आहे.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत