उच्च प्राथमिक शाळा चांपा येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
उच्च प्राथमिक शाळा चांपा येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,चंद्रपूर : दिनांक 2 ऑक्टोबर रोजी उच्च प्राथमिक शाळा चांपा येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला. त्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोशनीताई गुप्ता तसेच गावचे सरपंच अतीशजी पवार उपस्थित होतेे. त्याबरोबरच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मितारामजी भोसले अंगणवाडीच्या सेविका शिलाताई अडकणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चंदाताई गायकवाड यांनी केले या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी यांचे जीवनावर भाषणे झाली. लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी श्री चंदाताई गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनाविषयी सरपंच साहेब यांनी मार्गदर्शन केलेे. शेवटी श्रीमती सारिका वेलके यांनी आभार प्रदर्शन करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत