Breaking News

तेरणा नदीच्या पुलावर माेटार सायकलचा समाेरा समाेर अपघातात दाेन ठार दाेन जखमी

 तेरणा नदीच्या पुलावर माेटार सायकलचा समाेरा समाेर अपघातात दाेन ठार दाेन जखमी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, शिवाजी निरमनाळे, लातूर : लातुर जहिराबाद महामार्गावरील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा नदीच्या पुलावर दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सांयकाळी 6 च्या दरम्यान माेटार सायकल क्र एम एच 24 आर 4719 व एम एच 14 E T 6758 या दाेन माेटार सायकलची समाेरा समाेर जाेरदार धडक बसली. यात दाेन्ही माेटार सायकल वरुन चाैघे जन उडुन दुरवर फेकले गेले . 

 अपघात इतका जबरदस्त होता की दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला . तर एक गंभीर जखमी झाला असुन चाैथा किरकोळ जखमी झाला आहे या जखमीना औराद पाेलिसांनी हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातात सूर्यकांत हाणमंत खांडेकर वय 65 वर्षे व अशाेक गुणवंतराव काेळेकर पाटील वय 52 वर्षे रा केसरजवळगा ता भालकी यांचा जागीच मृत्यू झाला.

  हे दाेघे लातुरहुन आपल्या गावाकडे केसरजवळगा येथे जात हाेते तर साेमपुर ता भालकी येथील सतिश तानाजी बिरादार वय 29 वर्षे व मुकेश छञुगन बिरादार हे दाेघे माेटार सायकलने तुळजापूर देवी दर्शनासाठी जात हाेत हे दाेघे जखमी झाले आहेत यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती औराद पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक गाेपाळ शिंदे दिली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत