बोंडगाव देवीच्या सरपंच बोरकरवर अपात्रतेची टांगती तलवार
बोंडगाव देवीच्या सरपंच बोरकरवर अपात्रतेची टांगती तलवार
..निवडणूक खर्च सादर केला नाही,जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे,अर्जुनी मोरगाव : तालुक्यात 2021 ला ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.अनेक विजयी उमेदवारांनी या निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित मुदतीत सादर केला नाही.या कारणाने गोंदिया जिल्हाधिकारी नैना गुंडे यांनी राजपत्राद्वारे आदेश काढून तालुक्यातील 51 ग्रामपंचायत सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.या आदेशात बोंडगाव देवी येथील सरपंच प्रतिमा आनंदराव बोरकर यांचाही समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे तालुक्यात एकच खडबड माजली आहे.
111111111111
प्राप्त माहितीनुसार,15 जानेवारी 2021 ला तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता मतदान झाले.18 जानेवारीला मतमोजणी झाली.विजयी उमेदवारांना निकालाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणुक खर्चाचा हिशोब सादर करने बंधनकारक आहे. मात्र 17 ग्रामपंचायतीच्या 51 सदस्यांनी हा खर्च सादर केला नाही.ज्या विजयी उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही त्यांना नोटीस देऊन सुनावणीच्या तारखेस त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.मात्र संबंधित उमेदवारांनी प्रतिसाद दिला नाही.
यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेत निवडणूक खर्चाच्या हिशोब सादर केला नाही. यासाठी संबंधितांकडे कोणतेही कारण किंवा समर्थन नाही, याची खात्री पटल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ब व निवडणूक खर्चाचे आदेश क्रमांक चार 27 ऑगस्ट 2021 अंतर्गत जिल्हाधिकारी नैना गुंडे यांनी या उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधी करिता निलंबित करण्याचा आदेश 5 ऑगस्ट 22 ला पारित केला.या आदेशानुसार बोंडगाव देवीच्या सरपंच प्रतिभा बोरकर यांच्यासह 51 विजयी उमेदवारावर निलंबनाची कारवाई होणार आहे.
निलंबनाचा आदेश मात्र सरपंच कार्यमुक्त नाही.
5 ऑगस्टला जिल्हाधिकारी यांनी निलंबनाचा आदेश दिला.65 दिवसांचा कालावधी लोटला. मात्र बोंडगाव देवीच्या सरपंचाला अपात्र करून कार्यमुक्तीची कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी यांनी का? केली नाही.हा प्रश्न अनुत्तरीत आहे.या कालावधीत सरपंचांनी अनेक आर्थिक व्यवहार आणि निर्णय घेतले ते निर्णय रद्द करण्यात यावे. सरपंचावर अपात्रतेची कारवाई करून कार्यमुक्त करावे.या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य ऊषा पुस्तोडे, रतनलाल बोरकर आणि गावकऱ्यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया,ग्राम विस्तार अधिकारी सानप,खंड विकास अधिकारी निमजे यांना देण्यात आले.सरपंच प्रतिमा बोरकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करून कार्यमुक्त होण्याच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
आदेशाकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून 65 दिवसा पर्यंत संबंधित सदस्यांना अपात्र करून निलंबनाची कारवाई झाली नाही.यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केली हे सिद्ध होते. या प्रकारामुळे तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
खर्च सादर केला-बोरकर
या संदर्भात सरपंच प्रतिमा बोरकर यांनी आम्ही खर्चाचा अहवाल सादर केला.त्याची पोचपावती आमच्याकडे आहे. या संदर्भात 4 मे 2022 ला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली.त्यावेळी खर्चाची पोचपावती संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती अशी प्रतिक्रिया दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत