राज्यस्तरीय गोल्ला - गोलकर (यादव) समाजाचा ऊपवर - ऊपवधु परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्तधारकांचा सत्कार सोहळा
राज्यस्तरीय गोल्ला - गोलकर (यादव) समाजाचा ऊपवर - ऊपवधु परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्तधारकांचा सत्कार सोहळा
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपुर येथे भव्य राज्यस्तरीय गोल्ला - गोलकर (यादव) समाजाचा ऊपवर - ऊपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्तधारकांचा सत्कार सोहळा गोल्ला-गोलकर ,गोल्लेवार-यादव समाज संघटना जिल्हा चंद्रपुर तर्फ दिनांक 30 आॕक्टोबर 2022 वेळ सकाळी 11 वाजता राजीव गांधी सभागृह ,जंयत टाॕकीज जवळ ,चंद्रपुर येथे भव्य राज्यस्तरीय ऊपवर-ऊपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्तधारकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक - ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने ,सांस्कृतिक कार्य ,मस्त्यव्यवसाय ,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा , कार्यक्रमाचे अध्यक्ष - गणपतराव बुर्रीवार जेष्ठसमाजसेवक , प्रमुख अतिथी - रविकिरण यादव, चित्रपट निर्माते तथा साई वैकुंठ ट्रस्ट आदिलाबाद (तेलंगाणा राज्य ) ,नामदेवराव आयलवाड प्रदेश अध्यक्ष गो.गो.यादव समाज सघंटना ,क्रिष्णाजी यादव - जेष्ठसमाजसेवक नागपुर ,प्रकाशराव मॕकलवार जेष्ठसमाजसेवक यवतमाळ ,श्रीरामजी गालेवाड जेष्ठसमाजसेवक पुणे ,मनोहरजी बोदलवार जेष्ठसमाजसेवक गडचिरोली ,पुरुषोत्तम कोमलवार सेवानिवृत्त नायब तहसिलदार मुल ,श्रीनिवास जल्लेवार मोटार वाहन निरीक्षक चंद्रपुर ,
प्राचार्य डाॕ.भास्कर बहिरवार गुरुनानक महाविद्यालय बल्लारपुर ,दिगांबर जंगीलवाड सेवानिवृत्त ऊपकुलसचिव कृषि विद्यापीठ परभणी ,संदेशजी कामटे - कार्यकारी अभियंता मुबंई ,दिगांबरजी करेवाड जेष्ठसमाजसेवक नांदेड ,सुनिल ऊट्टलवार नगरसेवक नगरपंचायत सिदेंवाही ,प्राचार्य साईनाथ आदर्लावार,महात्मा गांधी विद्यालय आरमोरी , भास्कर नन्नावार बांधकाम सभापती नगरपंचायत सिदेंवाही ,संतोष मंथनवार जिल्हाध्यक्ष गडचिरोली ,आंनदजी विरय्या माजी नगरसेवक बल्लारपुर ,यशवंत दंडीकवार जेष्ठसमाजसेवक गडचिरोली ,
आशिष कावटवार विरोधी पक्षनेता नगरपंचायत पोंभुर्णा ,मलन्नाजी बुरमवार जेष्ठसमाजसेवक गडचिरोली ,सोमेश्वरजी पाकेवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिदेंवाही आदि मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत. तरी या राज्यस्तरीय महामेळाव्याला महाराष्ट्रातील गोल्ला-गोलकर ,गोल्लेवार-यादव समाजबांधवांनी मोठ्या संंख्येनी ऊपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष -अजय मॕकलवार , ऊपाध्यक्ष - दिलीप मॕकलवार ,किरण चेनमेनवार ,कोषाध्यक्ष - कृष्णाजी दाऊवार ,सहसचिव - शंकर मद्देलवार ,श्यामराज भंडारी ,संघटक - प्रविण भिमणवार तसेच संपुर्ण कार्यकारणी सदस्यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत