ग्रा.प.मचारणा प्रशासनाच्या उदाशिण धोरणाने नळ पाणी पुरवठा योजना ठरणार पांढरा हत्ती !
मचारणा येथील प्रकार, ग्रामवासी तहानलेलेच
४७.४७ लाख रुपये पाण्यात जाण्याची शक्यता
प्रशासन सुस्त, कंत्राटदार मस्त
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम, भंडारा : ग्रामीण परिसरातील जनतेला पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे. या करिता शासन लक्षावधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार करतो. पण बांधकाम पूर्ण होऊनही गावकऱ्यांना पिण्याचे पाणीच उपलब्ध केले गेले नाही. याचा प्रत्यय मचारणा, तालुका लाखनी येथे आला. पाणी पुरवठा विभागाचे मार्फत ४७ लाख ४७ हजार रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन ३ महिन्याचा कालावधी लोटला तरी ग्रामस्थ तहानलेलेच असल्यामुळे पाणी पुरवठा योजना पांढरा हत्ती ठरणार आहे.
मचारणा, तालुका लाखनी येथील लोकसंख्या ११६५ असून ४ सरकारी विहिरी व ७ हातपंपाचे माध्यमातून गावकऱ्यांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असे. पण देखभाल दुरुस्ती अभावी विहिरी निकामी झाल्या असून हात पंपांनाही कमी पाणी येत असल्यामुळे नेहमीच गर्दी असे. ग्रामपंचायत कमिटीच्या मागणीवरून २०१८-१९ या आर्थिक वर्षात नवीन नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी प्रदान करण्यात आली. तांत्रिक मान्यता क्रमांक ९६ दिनांक २४ जानेवारी २०११ तर प्रशासकीय मान्यता क्रमांक १२६८/२०११ दिनांक ०४/०६/२०११ रोजी देण्यात आली. अंदाजपत्रकिय रक्कम ५० लाख ४९ हजार रुपये असली तरी ई-निविदा पद्घतीने ४७ लाख ४७ हजार कमी किमतीत उमा कन्स्ट्रक्शन देवरी, जिल्हा गोंदिया यांना हे नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम देण्यात आले.
कार्यारंभ आदेश ८ मार्च २०१९ रोजी देण्यात आला असला तरी कोविड-१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही काळ पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम बंद होते. जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर कामास सुरुवात करण्यात आली. जलकुंभ, पाइपलाइन, जलस्त्रोत विहीर व स्विच रूम असे पाणी पुरवठा योजनेचे स्वरूप होते. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग भंडारा सध्याचे उपविभाग साकोली च्या कनिष्ठ अभियंता श्रुती मेघे यांचेकडे सोपविण्यात आले होते. पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले असले तरी चाचणी चे दिवशी पाइपलाइन फुटली असल्यामुळे जलकुंभात पाणी गेलेच नसल्यामुळे गावकरी तहानलेले आहेत.
त्यामुळे लक्षावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना पांढरा हत्ती ठरणार आहे. ग्रामपचांयत प्रशासणाने लाभार्थिकडून कनेक्शण फिस 1000 रुपये घेतले पण अजून पर्यत पाणी मिळाले नाही. ग्रा.प. प्रशासनाने कनेक्शन लवकरात लवकर द्यावे नाहि तर कनेक्शन ची घेतलेली फिस परत करावी. अशी गावकरी दबक्या आवाजात बोलत आहेत. लोकसेवक पदाचा पडला विसर ?
मचारणा येथे लक्षावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येऊनही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. या बाबद प्रतिक्रिया घेण्याकरिता पाणी पुरवठा उपविभाग साकोली येथील कनिष्ठ अभियंता श्रुती मेघे यांचे भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता मला फोनवर काहीही विचारू नका. तुम्हाला जे काही माहिती पाहिजे असेल ती लेखी द्यावी. असे उर्मटपणाचे उत्तर दिल्याने या कनिष्ठ अभियंत्याला लोकसेवक पदाचा विसर पडल्याचे दिसून येते.
हातपंपावर नंबर लावण्यासाठी गुंडांची(घगरा) गर्दी
मचारणा येथील जनतेला पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध होण्याकरिता नवीन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. बांधकाम पूर्णत्वास येऊन ३ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा लोकांना पिण्याचे पाणीच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे हात पंपावर नंबर लागावा. याकरिता गावकरी गुंड(घगरा) ठेवतात. त्यामुळे हातपंपावर गुंड(घगरे) चीच गर्दी दिसून येते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत