थोमपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवात साजरा
थोमपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवात साजरा
त्यानिमित्ताने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सुभाष अलगमकर, राजुरा : राजुरा तालुक्यातील थोमपूर येथे आज दि 14 रोजी पंचशील बौद्ध मंडळ थोमपूर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प देऊन पूजन करण्यात येऊन सर्वांनी उभे राहून बुद्ध वंदना म्हटल्या गेले व उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व शब्दसुमनाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रकाश टाकला.
त्यानंतर गावातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री सकरू सबावत, रेल्वे विभागातील कर्मचारी प्रेमचंद मंदा, अंगणवाडी सेविका सौ. ज्योतीताई तनिरवार या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल व श्रीफड देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या आयुष्यातील पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा देण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना श्री दीपक चौधरी, प्रदीप बोटपल्ले, सुभाष अलगमकार यांनी आपल्या मनोगतातून आजच्या काळात शिक्षणाचे महत्त्व लक्षात आणून दिले तसेच संविधानाचे महत्व पटवून दिले तसेच शांती, समता, बंधुता या गौतम बुद्ध यांची त्रिसूत्री उपस्थितांना पटवून दिले तसेच अध्यक्षीय भाषणात मा. अविनाश जाधव यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पटवून देतांना म्हटले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांना प्रेरित होऊन समाजातील मागासलेल्या लोकांना समान नागरी कायदा अस्तित्वात आणून सर्वांना समान हक्क मिळवून दिले त्यामुळे आज आपण गुण्यागोविंदाने समाजात वावरताना दिसतो आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अविनाश जाधव माजी सदस्य जि प चंद्रपूर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री साजिद बियाबानी कोषाध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, भिमय्या अंगलवार माजी सदस्य पं स राजुरा, तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक भाऊजी जाबोर, इसना राठोड, बळीराम चव्हाण, शंकर सत्रे अध्यक्ष तं मु समिती सुबई, प्रकाश रोहणे, दीपक चौधरी, प्रदीप बोटपल्ले, सुभाष अलगमकार मनोज राठोड, विलास लखमापुरे, संजय लखमापुरे कचरू जुनघरे, तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिवाकर लखमापुरे तर आभार प्रदर्शन प्रदीप बोटपल्ले यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत