Breaking News

सिरोंचा तालुक्यात नावरात्रोसावत ९ दिवस वेगवेगळ्या प्रकारे बतकम्मा देवीची सजावट

 सिरोंचा तालुक्यात नावरात्रोसावत ९ दिवस वेगवेगळ्या प्रकारे बतकम्मा देवीची सजावट

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,रितेश मनचला, सिरोंचा : सिरोंचा तालुका हा प्राणहिता , गोदावरी , इंद्रावती या तीन प्रमुख नद्यांचा कटावर वसल आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात तेलंगाणा राज्यातील संस्कृती पाहायला मिळते. तालुक्यात मराठी भाषेसाह तेलगू व इतर भाषा बोलल्या जातात. याचच एक भाग म्हणून तालुक्यात नावरात्रोसावत ९ दिवस वेगवेगळ्या प्रकारे बतकम्मा देवीला सजावट करतात. पहिल्या दिवशी येंगीलीफुला बतकम्मा असे म्हणतात. 

पितृ मोक्ष अमावस्येच्या दिवसापासून प्रारंभ करतात. दुसऱ्या दिवसाला अटकुला बतकम्मा असे म्हटले जाते. तिसऱ्या दिवशी मुद्दापप्पू बतकम्मा, चौथ्या दिवशी नानाबीय्यम बतकम्मा, पाचव्या दिवशी अटला बतकम्मा, सहाव्या दिवशी आलेगीना बतकम्मा असे म्हटले जाते. याचा अर्थ रुसलेली बतकम्मा देवी असा असुन या दिवशी बतकम्मा खेळत नसतात. सातव्या दिवशी वेपकायला बतकम्मा, आठव्या दिवशी वेण्णामुद्दाला बतकम्मा आणि नवव्या दिवशी सहूला बतकम्मा असे म्हटले जाते.

तेलंगाणा राज्यच बतकमा हे सण हिंदू महिलांद्वारे फुलांचं सण म्हणून साजरा केले जातात. बतकमा म्हणजे गौरी पूजा असून महिला विविध प्रकारचे फुल आणून पितृ मोक्ष अमावस्या दिवशी उत्सव सुरू करून 9 व्या दिवशी 4 ते 5 फूट बतकमा बनवून गावातील सर्व मुख्य चौकात किंवा मंदिराच्या आवारात एकत्र ठेवून रात्रभर पारंपरिक पद्धतीने नृत्य करतात सकाळी या बतकमा(गौरी)ला वाहत्या पाण्यात विसर्जन केले जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत