Breaking News

शालेय व्यवस्थापन समिती रायपूरची बिनविरोध निवड

 शालेय व्यवस्थापन समिती रायपूरची बिनविरोध निवड

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : दिनांक 7 ऑक्टोबर रोजी शालेय व्यवस्थापन समिती रायपूर चे पुनर्गठन करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सचिन बंप्पा गाडेकर व उपाध्यक्षपदी हरिभाऊ गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दिपाली महेश गाडेकर,शितल कैलास गाडेकर, रामेश्वर रमेश गाडेकर, मंगल नितीन काकडे, 

वैशाली माणिक काजळे, रामप्रसाद काकडे, राजेंद्र गाडेकर, सरस्वती भगवान हिंगे, राजेश गाडेकर, रेखा शिवाजी हिंगे, शितल आसाराम गाडेकर,किशोर राऊत, वनिता रामेश्वर गाडेकर ,अशोक गायकवाड तर शिक्षण तज्ञ सदस्य म्हणून दीपक रामपूरकर ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून सोनाली गाडेकर शिक्षक प्रतिनिधी प्रकाश काळे मुख्याध्यापक गणेश देशमाने अश्याप्रकारे निवड झाली या निवडबद्दल सरपंच आश्रोबा हिंगे उपसरपंच बापूराव गाडेकर तसेच सर्व पालकांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत