Breaking News

विसापूर मध्ये वाघाचा धुमाकूळ जोमात, गावकरी मात्र भितीने कोमात

 संदीप पोडे यांची वन विभागाकडे विसापूर मध्ये दुसऱ्यांदा वाघ जेरबंदी करण्याची मागणी

जनतेचा हित जपत वन विभागणी रात्रौ पाळी निगारांनी करिता लावली माणसे

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बल्लारपूर : विसापूर मध्ये धुमाकूळ घालत असलेल्या वाघाला तात्काळ जेरबंदी जेरबंद करण्यात यावे, वॉर्ड.क्र. 5 मध्ये वाघाचे दर्शन रोज नागरिकांना होत आहे. रोज विसापूर मधील नागरिकांचा घरी येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला करत आहे. दिनांक 8-10-2022 ला सुमारे 7.15 PM ला विकास पाल यांच्या घरी येऊन वाघाने, गोठ्यात बांधून असलेल्या बकरीवर हल्ला करून ठार केले. नागरिकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातवावरण पसरले आहे. नागरिकांना जीवाचा धोका असून. पेपर मिल मजदूर देखील आपला जीव धोक्यात घालून ड्युटीवर ये-जा करत आहे. तरी आपण तात्काळ वाघाला जे्रबंद करून जनतेला या आलेल्या सकटातून काढण्याची विनंतीमय मागणी केलेली आहे. लवकरच बंदोबस्त करून अशे आश्वासन देखील वनविभागणे दिलेले आहे. व याची. माहिती सुद्धा. श्री. ना. मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनां दिलेली आहे. व आशिष जी देवळते यांना दिलेली आहे. संदीप श्रीहरी पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) यांचा मागणीकडे नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे.श्री. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार

(वन मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांना माहिती दिली असल्यामुळे मागणीली यश येईल अशीच अशा नागरिकांना लागली आहे.

आशिष भाऊ देवतळे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ) यांनी सुद्धा समस्या दूर करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत