19 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
19 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील 19 वर्षीय परमेश्वर गजेंद्र पाटील यांनी नैराश्याच्या भरात आपले राहते घरात गळफ़ास घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.परमेश्वर पाटील याने आपल्या घराला लागून असलेल्या कुट्टीच्या शेडमध्ये छताला दोरीच्या साह्याने गळफ़ास घेत जीवन यात्रा संपवलेली आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू न शकल्याने याबाबतीत जितेंद्र बाबुराव पाटील यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस स्टेशनला अनैसर्गिक मृत्यू प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोहेकाॅ सचिन चौधरी हे करीत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत