Breaking News

आमदार सुभाष धोटे व उपविभागीय वनअधिकारी यांची तुम्मागुडा गावाला भेट

 आमदार सुभाष धोटे व उपविभागीय वनअधिकारी यांची तुम्मागुडा गावाला भेट

बिबट्याच्या हल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना आ. धोटे कडून सांत्वन

बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाखाचे सानुग्रह अनुदानाची मदत

उपविभागीय वनअधिकारी यांचेकडून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सुभाष अलगमकर, राजुरा : काही दिवसांपूर्वी तालुक्यातील सुबई ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थोमपूर येथील भीमराव भद्रु घुंगलोत हा इसम बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीना सांत्वन देण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. सुभाष धोटे व श्री. ए. बी. गर्कल, उपविभागीय वनअधिकारी राजुरा यांनी थोमपूर येथे आले. व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा चार लाख रुपयांचा निधी धनादेश च्या स्वरूपात सदर कुटुंबातील लोकांना वितरीत केले तसेच जनतेच्या इतर समस्यांचे निराकरण केले.

सदर भेटीत जनतेनी परिसरात होत असलेल्या परिस्थितीची व्यथा मांडली. आमच्या परिसरात वाघ, बिबट व रानटी डुकराचा खूप हौदास असून पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे व वन विभागाकडून मिळालेल्या झटका मशीनचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नाही आहेत शेतात मशीन लावून सुध्दा वन्य प्राणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे त्यामुळे शेताच्या काटी असलेल्या जंगल परिसर सभोवताल कुंपण करण्यात यावे, गावस्तरावर झटका मशीन पुरवठादार नेमण्याचा अधिकार देण्यात यावा, झटका मशीन प्राप्त कर्त्यांना शेतातील नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना बॅटरी टॉर्च चे वाटप करण्यात यावे, तसेच परिसरात वावरत असणाऱ्या वाघ, बिबट यांना जेरबंद करण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्यात यावी , जनतेच्या या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत मा. आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचविले व उपविभागीय वन अधिकाऱ्यांनी सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

तसेच मध्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतजमिनीवर अतिक्रमण करून शेतातील १४० सागाचे झाडे तोडल्यासंदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे व श्री. ए. बी. गर्कल, उपविभागीय वनअधिकारी राजुरा यांना तक्रार निवेदन देण्यात आले.

तसेच मा. आमदार साहेबांनी सुबई ग्रामपंचायत येथे भेट देवून नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना पुष्पगुच्छ देवून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या भौतिक समस्या जाणून संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून पूर्ण करण्याबाबत आदेश दिले, 

या प्रसंगी श्री, डी, एम, पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विरुर स्टेशन, श्री, एन जी गोविंदवार, वन परिक्षेत्र अधिकारी, सौ, सुरेखा आत्राम सरपंचा (सुबई,) रामलू राठोड उपसरपंच (सुबई), श्री अभिजित धोटे, श्री, अभिजित भुते, श्री, भीमय्या अंगलवार, भाऊजी जाबोर, बळीराम चव्हाण, संजय लखमापुरे, धनराज चिंचोलकर, अरुण सोमलकर, (चिंचोली), दिपक चौधरी, बंडू येलमुले, अरुण पर्वतवार, राहुल बर्लावार, तसेच वनपरिक्षेत्र विरुर चे सर्व कर्मचारी, पी आर टी समूह, व परिसरातील सुबई, थोमपूर, विरुर, चिंचोली येथील जनता उपस्थित होते,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत