Breaking News

रेल्वेसंबंधित पाठपुराव्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.श्री. रावसाहेब दानवे पाटील यांची आमदार राहुलदादा कुल यांनी घेतली भेट

रेल्वेसंबंधित पाठपुराव्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.श्री. रावसाहेब दानवे पाटील यांची आमदार राहुलदादा कुल यांनी घेतली भेट

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पुणे : दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुराव्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.श्री. रावसाहेबजी दानवे पाटील यांची आमदार राहुलदादा कुल यांनी मुंबई येथे भेट घेतली होती. पुढील चर्चेसाठी दिल्ली येथे भेटीसाठी वेळ दिली होती,आमदार राहुलदादा कुल यांनी दिल्ली येथे माननीय दानवेंची भेट घेतली व मध्य रेल्वे विभाग, दौंड शहर व तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली यावेळी आमदार राहुलदादा कुल यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीसाठी पुढील आठवड्यात दौंड तालुक्यात बैठक व स्थळपाहणीचे आयोजन करण्याचे ठरले.  

बैठकीमध्ये पुणे -दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मागण्या व विविध समस्यांउपस्थित केल्या त्यामध्ये प्रामुख्याने - दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी. माननीय मंत्री महोदयांच्या आदेशाने दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद सुरु करण्यात यावे. पुणे - सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे उर्वरित तांत्रिक काम तात्काळ पूर्ण करून ती नागरिकांसाठी खुली करण्यात यावी.  खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात यावा तसेच कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या RUB चा कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून त्याठिकाणी पाण्याच्या निचरा होण्यास होत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत. 

दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे व पुनर्वसन होईपर्यंत रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांची घरे खाली करण्यात येऊ नयेत. दौंड - पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत व पुणे - हैद्राबाद - पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई - चेन्नई - मुंबई सुपरफास्ट, LTT - विशाखापट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा. वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे - दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर ,उरुळी आणि लोणी च्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी. आदी मागण्या आमदार राहुलदादा कुल यांनी यावेळी केल्या.सर्व मागण्यांच्या बाबत रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेबजी दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, यावेळी आमदार श्री. जयकुमार (भाऊ) गोरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत