लोणवाडी येथील पाणंद रस्त्याची दुर्दशा, शेतकऱ्यांना रोज करावी लागते तारेवरची कसरत
लोणवाडी येथील पाणंद रस्त्याची दुर्दशा, शेतकऱ्यांना रोज करावी लागते तारेवरची कसरत
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील पाणंद रस्त्याची दुर्दशा झाल्याने शेतकऱ्यांना शेतातील माल वाहुन नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच लोणवाडी शेतशिवारातील रस्ता हा लोणवाडी, जामठी, बेटावद रांजणी इतर शेतशिवारातील जाण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतूकीसाठी जोडणारा पाणंद रस्ता आहे, मात्र विना देखभाली अभावी पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी पंचड त्रस्त झाले आहेत.
शेतातील बि बियाणे खते उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोईचे होईल या करीता पाणंद रस्त्याचा उपयोग होतो, मात्र या रस्त्यावर चिखल झाल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते पायवाट बैलगाडी टॅक्टर साह्याने शेतातील माल वाहतूकीसाठी वापरले जात आहेत. या परीसरात पाणंद रस्त्यावर मोठ मोठे खड्डे व चिखल साचला असून, शेतकऱ्यांच्या माल वाहतूक बैलगाडी,अवजड वाहन, ट्रॅक्टर चिखलामुळे फसत आहे. पाण्याच्या डपक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे, पावसाळ्याच्या दिवसापासुन पाणंद रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, येथे दुरुस्ती करून नूतनीकरण करावे, लवकरात लवकर या पाणंद रस्त्याची दुरुस्ती करावी, आणि शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत