Breaking News

जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघाच्या निवडणुकीत खा.सुनील मेंढे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा समर्थित परिवर्तन पॅनलचा विजय

जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघाच्या निवडणुकीत खा.सुनील मेंढे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा समर्थित परिवर्तन पॅनलचा विजय

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : दिनांक 11 नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तुमसर येथे खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात सभा घेऊन मोर्चे बांधणी करण्यात आली होती. 13 नोव्हेंबर ला झालेल्या निवडणूकीत भाजपा समर्थित परिवर्तन पॅनलचे सात उमेदवार या निवडणुकीत निवडून आले. त्यांना बिनविरोध निवडून आलेल्या 2 सदस्यांनी पाठिंबा दिला. 

भंडारा जिल्हा कृषी औद्योगिक संघाच्या निवडणुकीत भाजपा समर्पित परिवर्तन पॅनेलच्या छत्राखाली निवडून आलेल्या भंडारा भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.हरेन्द्रजी रहांगडाले व विजयी सर्व उमेदवारांचे आज नागपूर येथे भाजपा कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ संघटन मंत्री मा.डॉ.उपेंद्रजी कोठेकर, आमदार डॉ.परिणयजी फुके, जिल्हाध्यक्ष शिवरामजी गिर्हेपुंजे, माजी खासदार शिशुपालजी पटले आदी उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत