शिवरस्ता मोकळा करून घ्यावा या मागणीसाठी बोदवड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण मागे
शिवरस्ता मोकळा करून घ्यावा या मागणीसाठी बोदवड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण मागे
खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनास कारवाईसंबंधी सूचना दिल्याने उपोषण मागे
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : तालुक्यातील मौजे चिंचखेड प्र.बो. -धोंडखेडा शिवरस्त्यावरील सुमारे २०० ते २५० मीटर लांबीच्या भाग काही लोकांनी बेकायदेशीर बळकावून त्यावर पीक पेरणी केली आहे त्या मुळे सार्वजनिक रस्ता बंद झाला आहे. या लोकांवर गुन्हे दाखल करून रस्ता मोकळा करून घ्यावा या मागणीसाठी शेवगे खुर्द येथील सोपं नामदेव ताठे यांनी मागणी केली होती पण कारवाई न झाल्याने त्यांनी आज सकाळ पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता.या विषयी दुपारी पाचच्या सुमारास प्रशासकीय कामाचे निमित्ताने आलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी उपोषणकर्ते ताठे यांची भेट घेतली व तहसीलदार श्वेता संचेती यांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार तहसीलदार या प्रकरणी नियमानुसार कारवाईस तात्काळ सुरवात करण्यात येईल असे पत्र उपोषणकर्ते यांना देण्यासाठी उपोषणस्थळी आल्या. या वेळी बोदवड नगराध्यक्ष आंनदा पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्ते यांचे बोलणे आमदार चंद्रकांत पाटील यांचेशी करून दिले.आमदार पाटील यांनी सुद्धा तहसीलदार यांचेशी योग्य त्या कारवाई संबधी बोलून सूचित करतो असे आश्वासन दिले. त्या नुसार उपोषणकर्ते ताठे यांनी तहसीलदार संचेती यांचे कडून पत्र स्वीकारले व उपोषण मागे घेतले. या वेळी नगरसेवक सईद बागवान, गोलू बरडीया, हर्षल बडगुजर, पप्पू चव्हाण, सुभाष देवकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत