विरुर स्टेशन येथे मा ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित
विरुर स्टेशन येथे मा ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित
तसेच विरुर स्टेशन येथे भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सुभाष अलगमकर, राजुरा : तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या विरुर स्टेशन येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दि 14 रोजी महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित केला तसेच विरुर स्टेशन क्षेत्रात प्रथमच भाऊंच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार महाराष्ट्र राज्याचे मंत्री झाल्याचे औचित्य साधून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्याअनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे विरुर शहर अध्यक्ष श्री भीमरावजी पाला यांच्या पुढाकाराने उभारलेल्या भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मंत्रीमहोदयाचे आगमन झाले, नियोजित कार्यक्रमात राजुरा क्षेत्राचे माजी आमदार मा. संजय धोटे व श्री सुदर्शन निमकर यांनी या क्षेत्रातील समस्या भाऊच्या निदर्शनास आणून दिल्या. मागील काही वर्षांपासून बंद असलेली जोगापूर यात्रा सुरु करण्याचे आवाहन केले, राजुरा तालुक्यातील हनुमान मंदिर देवस्थान असलेले जोगापूर यात्रा एक महिण्याकरिता विनाशुल्क सुरू करण्याबाबत वनविभागाला निर्देश देवून जनतेची मागणी पूर्ण केली, तसेच नागरिकांनी दिलेले निवेदन स्वतः जातीने लक्ष देऊन आपल्या अधिकारात असलेले सर्व कामे पूर्ण करण्याचे जनतेला आश्वासन दिले.
याप्रसंगी मा. देवराव भोंगळे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर तथा भाजप जिल्हा अध्यक्ष, मा संजय धोटे, माजी आमदार राजुरा, मा सुदर्शन निमकर, माजी आमदार राजुरा, मा नामदेव डाहूले, जिल्हा महामंत्री, चंद्रपूर, मा सुनिल उरकुडे, भाजप तालुका अध्यक्ष, राजुरा, मा भीमराव पाला, शहर अध्यक्ष, विरुर स्टेशन, मा सतिश कोमरवेलीवार, सर्कल विरुर स्टेशन तसेच विरुर क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते,< /p>




कोणत्याही टिप्पण्या नाहीत