Breaking News

लम्पि आजाराचा कहर थांबेना येवती येथील आणखी एक बैल लम्पीमुळे मृत्यू ..¡¡

 लम्पि आजाराचा कहर थांबेना येवती येथील आणखी एक बैल लम्पीमुळे मृत्यू ..¡¡ 

 दहा ते पंधरा बैल लम्पी आजाराने ग्रस्त  

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राहुल बावस्कर, बोदवड : तालुक्यातील येवती येथील शेतकरी शांताराम त्र्यंबक वाघ (सरपंच) यांच्या बारा वर्षांच्या बैलांचा लम्पी आजारामुळे मरण पावला. बैलाची किंमत चाळीस हजार रुपये होती मागील आठरा दिवसांपासून त्यांच्या बैल बाधित होता. परंतु उपचारास प्रतिसाद न दिल्याने मरण पावला. या बैलांची शवविच्छेदन बोदवड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ दिपक साखरे डॉ वैभव पाटील सागर माळी यांच्या मार्फत पशुधन विकास अधिकारी डॉ दिपक साखरे यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

 त्या नंतर या बैलांचा मृतदेहास खड्डा करून पूरण्यात आले. यावेळी गावातील सरपंच शांताराम वाघ व निलेश वाघ शिवाजी वाघ विकास शिंदे गजानन कुंभार गजानन बावस्कर प्रल्हाद वाघ नारायण ठाकूर गोलू वाघ राजाराम कचरे अशोक सुकाळे इत्यादी उपस्थित होते तालुक्यातील लसीकरण बहुतांशी पूर्ण झाले असून या कामी खाजगी पशुधन पर्यवेक्षकांची मदत झाली असून अजूनही उपचारासाठी शासकीय यंत्रणेस त्यांचे सहकार्य होत आहे.आजपर्यंत तालुक्यात ११४४ जनावरे लंम्पीने बाधित असून ८९ जनावरांना मृत्यू झाल्याचे पशुधन विकास अधीकारी डॉ दीपक साखरे यांनी माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत