करंजी येथील दलित वस्ती सुधार योजनेची गटार ची कामे निष्कृष्ट दर्जाचे
करंजी येथील दलित वस्ती सुधार योजनेची गटार ची कामे निष्कृष्ट दर्जाचे
उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप
महा घडामोडी न्युज जिल्हा विशेष प्रतिनिधी, चेतन तायडे, जळगाव : बोदवड पंचायत समिती अंतर्गत करंजी ग्रुप ग्रामपंचायत येथे दलित वस्तीचे रस्ते व काँक्रीट गटार काम चालू असून, सदरचे काम करताना ग्रामसेवक व सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता दलित वस्तीचे कामे सुरू केली आहे. मंजूर कामाचे किती रकमेचे अंदाजपत्रक आहे किती कामे मंजूर आहे.याबद्दल ग्रामसेवक गोविंद राठोड करंजी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सविता विलास पाटील व उत्तम सुरवाडे ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे दलित वस्ती सुधार योजनेचे कामे अंदाज पत्रकाप्रमाणे न करता, निष्कृष्ट दर्जाचे करीत आहे. असा आरोप सविता विकास पाटील उपसरपंच व उत्तम सुरवाडे ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे.
सरपंच ग्रामसेवकांनी कामाची निवेदन काढता मंजूर करून ठेकेदारास काम दिले. यामध्ये सरपंच व ग्रामसेवक यांना अंदाजपत्रक बाबत माहिती विचारले असता, अंदाजपत्रक पंचायत समितीला आहे, असे उत्तर देत आहे. काम सुरू केले असून गटारीचे कामाचे अंदाजपत्रक किती रुपयाचे याबाबत कामाचा नावाचा फलक कुठे लावलेला दिसत नाही. यामुळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व जनतेस संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामसेवक गोविंद राठोड यांना कामा निविदाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की सदर कामाची निविदा नुतनीकरण केली असून, अंदाजपत्रक माझ्याकडे नाही. पंचायत समितीला आहे.
सविता विकास पाटील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उत्तम सुरवाडे ग्रामपंचायत सदस्य यांची तक्रारीवरून शाखा अभियंता बागुल यांनी कामाला भेट दिली असून, कामाची पाहणी केली गटार कामाच्या रेती व खड्ढीचा कस वापरला जात आहे. याबाबत कामाचा दर्जा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. सदरचे काम अंदाज पत्रका आळप्रमाणे न झाल्यास कामाच्या ठिकाणी काम सुरू होण्याअगोदर कामाचा फलक न लावल्यास पंचायत समिती बोदवड येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा सविता विकास पाटील उपसरपंच करंजी पाच देवळी व उत्तम सुरवाडे ग्रामपंचायत सदस्य यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत