जि.प.प्राथमिक शाळा येवती ता.बोदवड येथे राणी लक्ष्मीबाई व प्रियदर्शनी इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी
जि.प.प्राथमिक शाळा येवती ता.बोदवड येथे राणी लक्ष्मीबाई व प्रियदर्शनी इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : दि.१९नोव्हे.२०२२ रोजी जि.प.प्राथमिक शाळा येवती येथे भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात सर्व प्रथम बालकांनी तद्नतंर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला साबळे मँम यांनी प्रतिमा पूजन केले.सदर थोर पुरुष यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.श्री.मंडावरे सर व श्री.सुर्यवाड सर यांनी थोर पुरुष यांचे जीवनपट सांगितले.तदनतंर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मंडावरे सर यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत