पाच लाख रुपयांच्या सोन्यासह चोरांचा रोख रकमेवर डल्ला
खांबाडा येथे धाडसी चोरी
पाच लाख रुपयांच्या सोन्यासह चोरांचा रोख रकमेवर डल्ला
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर,वरोरा : वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील गजानन बुट्टे यांच्या घरावर मंगळवारच्या रात्री चोरट्यानी डल्ला मारत अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. खांबाडा येथील व्यावसायिक तथा शेतकरी गजानन बुट्टे हे काही कामानिमित्य येथून जवळच असलेल्या गणेशपूर या गावी आपल्या नातेवाईकाकडे मंगळवारला गेले होते.तेथे त्यांनी मुक्काम केला बुधवारला जेव्हा ते खांबाडा येथे परतले त्यावेळेस घरातील समोरच्या दाराचे कुलूप तोडलेले त्यांना दिसले.आणि घरात चोरट्यानी सर्व सामान।अस्ताव्यस्त करून कपाटातील।अंगठी,मंगळसूत्र,गोफ,आदि आठ तोळ्यांचे दागिने आणि दुकानातील घरी असलेली एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम ही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याची माहिती त्यांनी वरोरा पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार यांचे सह चंद्रपूर गुन्हे शाखेची चमू घटनास्थळावर पोहचून त्यांनी घटनेची शहानिशा केली. चंद्रपूरवरून।श्वानपथक आणि ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले.वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांचे सह ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची सूत्रे हलविली.पोलिसांनी या प्रकरणी।अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत