बोदवड तालुक्याला मिळाले पूर्ण वेळ तहसीलदार
बोदवड तालुक्याला मिळाले पूर्ण वेळ तहसीलदार
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गजानन बावस्कर, बोडवड : बोदवड तालुक्याला तब्बल सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शुभम राजेश मंदाने (दांडेकर) यांच्या रूपात पूर्णवेळ तहसीलदार मिळाला आहे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून त्यांना 24 नोवेंबर 16 जून 2023 पर्यंत तहसीलदार पदावर स्वतंत्र कारभार देण्यात आला आहे बोदवडला कायमस्वरूपी तहसीलदार मेळावा यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी लावून धरली होती एप्रिल महिन्यात तहसीलदार योगायोग टोम्पे यांचे निलंबन झाल्यानंतर अतिरिक्त बार मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती जितेंद्र कुवर व त्यानंतर परत संचेती यांच्याकडे देण्यात आला होता अतिरिक्त पदभार असल्याने अतिरिक्त तहसीलदाराकडून बोदवड तहसील कार्याला वेळच न मिळाल्याने नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली होती नंतर पुढील सात महिन्यासाठी पूर्ण वेळ तहसीलदार मिळाल्याने नागरिकांच्या प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होणार.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत