लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
जामनेर हादरले लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : जामनेर तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना जामनेर तालुक्यातील एका खेडेगावात उघडकिस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील १६ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. या पिढीवर संसद जगदीश अशोक पवार याने गुन्हा दाखल होण्याच्या तीन महिन्यापूर्वी वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्तावित केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने पहुर पोलीस स्थानक गाठत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित जगदीश पवार यांच्याविरुद्ध पाॅस्कोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत