Breaking News

जलचक्र येथे ग्राम स्वामित्व योजनेचे उदघाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

 जलचक्र येथे ग्राम स्वामित्व योजनेचे उदघाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

भूमापन होणार ड्रोनच्या सहाय्याने होणार मोजनी  

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तालुक्यातील जलचक्र येथे आज दुपारी 2 वाजता केंद्र सरकार व राज्य सरकार अनुषंगाने भूमि अभिलेख विभागा कडून ग्राम स्वामित्व योजचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यानी केले यावेळी भुमि अभिलेख विभागा कडून रूतुराज सोनवणे यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी या योजनेची माहीती भुमि अभिलेख भुसावळ विभाग अधिक्षक वंसत सोनवणे यांनी माहीती नागरिकाना दिली ग्राम स्वामित्व योजने माध्यमातून ड्रोन सर्वे आँफ इंडिया अंतर्गत तालुक्यातील 47 गावातील मिळकती होतील भुमि अभिलेख उतार्यावर नोदणी या तालुक्यातील फक्त सहाच गावाच्या नोदणी असुन ज्या गावान मधिल जागा मिळकती ह्या भूमि अभिलेख विभागात नोदणी नाहीत अशा मिळकतीचे ड्रोन कॅमेरा सहाय्याने सर्वे करून तसेच गावाचा योग्य नकाशा यामुळे तयार होऊ शकतो.

  प्रत्येक गल्ली घर बाध गावात याची भुमि अभिलेख कार्यालयात नोंद मिळू शकते व जी गाव नोंद नसुन तेथे नमुना क्रमांक आठ उतारा मिळतो तो काही वेळी अंदाजी सुध्दा असतो यामुळे गावठाण जागेचे वाद निर्माण होतात या ड्रोन ने मोजनी केल्यास त्या गावाचा योग्य नकाशा बनतो तसेच गल्ली घराचे रस्ते याचे योग्य अशी मोजनी करण्यात येणार आहे आणि नागरिकाची जागा मिळकत ही भुमि अभिलेख उतार्यावर येईल तसेच यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी या योजनेची माहीती सागतो यामुळे जागेचे वाद मिळतील तसेच उतारा नावाचा झाल्यास बँके कडुन कर्ज पण उपलब्ध होईल तसेच उतारा हा कायदेशीर कामे पण सुलभ होतील.

 जुन्या जलचक्र रस्ता काम सुरू असुन हे काम 1800 मिटरच मंजूर असून यानंतर हाच रस्ता पुढे 700 मिटर अपुर्ण राहत होता तो राहणार नाही काम जरी 1800 मिटर मंजूर असले तरी बाकी 700 मिटर सुध्दा काम आताच पुर्ण करण्यात येईल असे आमदार पाटील यांनी सांगितले यावेळी जलचक्र येथील मयुर पाटील यांनी हिंगलाज माता मंदिर काम शेवटच्या टप्प्यात असुन व्यामशाळेचे काम सुध्दा झाले याबद्दल त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील याचे आभार मानलेे.

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनिल पाटील नगराध्यक्ष आनंदा पाटील नगरसेवक दिनेश माळी राजेश नानवानी संजय गायकवाड गोलू बरडीया हर्षल बडगुजर पप्पू चव्हाण देवेंद्र खेवलकर निलेश माळी सुनिल बोरसे शांताराम कोळी राहुल शर्मा दिपक माळी धनराज पाटील ग्रा.प.सदस्य विजय सपकाळ ग्रा.प सदस्य योगेश पाटील ग्रा.सदस्य नारायण पाटील मा.पो.पाटील दिनकर पाटील बाळू गोसावी रंगनाथ गावंडे वासुदेव पाटील संदीप पाटील भारत पाटील ईश्वर गोसावी ईश्वर शेळके प्रभू पाटील विकास पाटील शंकर पाटील सुरेश पाटील रमेश पाटील अरुण गोसावी नितीन इंगळे गजानन पाटील पंडित घुले उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत