स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार
स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,पुणे : देश उभारणीच्या कामात समर्पीत भावनेने कार्य करणारे केंद्र, राज्य शासन, प्रशासन आणि महाराष्ट्र पोलिस विभागातील कर्तव्यदक्ष अधिकार्यांचे मनोबल वाढवणे त्यांना सतत प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा सन्मान करण्यात येतो. सुषमा चव्हाण यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एक महिला असूनही पोलिस खात्यात त्यांनी केलेली दमदार कामगीरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय मानवअधिकार सुरक्षा संघ अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार अनेक वर्षांपासून करत आला आहे. या आधुनिक आणि वेगवान युगात पोलिसांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. ती आव्हानं पेलण्यासाठी लोकसहभागाची नितांत आवश्यकता आहे. या कामी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाने प्रयत्न शील राहावे अशी अपेक्षा सुषमा चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप लोंढे, प्रदेश सल्लागार प्राचार्य मा.सतिश भोसले, पुणे जिल्हा अध्यक्ष अमित आदमाने, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राकेश थोरात, पुणे जिल्हा महीला उपाध्यक्ष राजनंदिनी गव्हाणे, पुणे जिल्हा सचिव शशिकांत तांदूळकर, पुणे जिल्हा विधिसल्लागार नितीन दसवडकर, वेल्हा तालुका अध्यक्ष नितीन भरम, संघटक पुणे जिल्हा रमेश गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष अजित साठे,पुणे शहर संघटक गंगाधर पुजारी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश जाधव ईत्यादी मान्यवर पदाधिकारी यावेळी ऊपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत