Breaking News

बोदवड नगरपंचायत समोर विनोद पाडर यांचा अंगावर पेट्रोल टाकत केला आत्मदहनाचा प्रयत्न

 बोदवड नगरपंचायत समोर विनोद पाडर यांचा अंगावर पेट्रोल टाकत केला आत्मदहनाचा प्रयत्न

महा घडामोडी न्युज जिल्हा विशेष प्रतिनिधी,जिया शेख, जळगाव : बोदवड नगरपंचायतला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची जागा शोधून देण्याबाबत विनोद पाडर यांनी 2 महिन्याआधी निवेदन दिले होते। जागा शोधून न दिल्यास त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता यासाठी दिनांक एक नोव्हेंबर रोजी नगरपंचायत समोर त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत जाळून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना वेळीच अटक करण्यात आल्याने मोठा अनर्थ होण्यापासून टळला, या वेळी नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोड़े यांनी जागा लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले।

 मलकापुर चौफुली येथील मुक्ताईनगर नगर रोड बस स्टॅन्ड चा संपूर्ण कॉर्नर व मलकापूर रोड या जागेवरील संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करून ती जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका करिता आरक्षित करण्यात यावी तसा ठराव उद्या होणाऱ्या दिनांक २/११/२०२२ च्या मासिक मीटिंगमध्ये मध्ये घेऊन जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सविस्तर माहिती पाठवून संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस इशू करणार आहे त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले आहे : आंदोलनकर्ते, विनोद पाडर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत