रखडलेले मनुर खुर्द येथील पुलाचे बांधकाम सुरू ? अरेच्चा,पण हे काय, बांधकामाचा दर्जा मात्र निष्कृष्ट ?
रखडलेले मनुर खुर्द येथील पुलाचे बांधकाम सुरू ? अरेच्चा,पण हे काय, बांधकामाचा दर्जा मात्र निष्कृष्ट ?
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जळगाव : बोदवड तालुक्यातील मनूर खुर्द येथील गावाजवळील पुलाचे बांधकाम गेल्या वर्षापासून राखडलेले होते, अनेक दिवसानंतर काम सुरू झालेय मात्र आता बांधकामाचा दर्जा निष्कृष्ट असल्याची ओरड होत आहे, तालुक्यातील मनूर खुर्द येथील गावाजवळील पुलाचे लाचे बांधकाम गेल्या वर्षापासून राखलेले होते. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबद्दल सुचित्रावृत्त क्लियर न्यूज ने प्रसिद्ध केले होते. त्यावेळी रेती नसल्याने कारण सांगत हे बांधकाम रखडले असल्याचा खुलासा बांधकाम विभागाने दिला होता.
मात्र लवकरच हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारास सुचित करू असे सांगितले होते, बांधकाम विभागाचे सूचनेनुसार उशिरा का होईना ठेकेदाराने बांधकाम सुरू केले, मात्र घाईत बांधकाम दर्जा मात्र ढासळला आहे, या बांधकाम दर्जा विषयी माहिती मिळाली असता या बांधकामा बाबत तपासून केली होती का ? अशी बांधकाम विभागास विचारणा केली असता बांधकाम पाहणी केली जाईल व अनेक निकषानुसार बांधकाम नसेल तर ठेकेदार असते दुरुस्त करण्यासाठी सूचित केले जाईल असे सांगण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत