Breaking News

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची भद्रावती तालुका स्तरावरील बैठक संपन्न

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची भद्रावती तालुका स्तरावरील बैठक संपन्न

प्रदेश संपर्कप्रमुख व जिल्हा संपर्कप्रमुख यांची उपस्थिती

ग्रामीण शहर तालुकास्तरावर सदस्य मोहीम

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची ग्रामीण शहर तालुकास्तरीय बैठक भद्रावती येथील कलाअकादमीत दिनांक१८ जानेवारी २०२३ ला आयोजित करण्यात आली होती. बैठकी प्रसंगी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिरानिक तर प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून जिल्हा संघटक चिंतामण आत्राम, विभागीय संपर्कप्रमुख सुरेश बांगडकर, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे यांची उपस्थिती होती. 

बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिरानिक यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनचा प्रस्ताव पारित करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीचे प्रस्ताविक चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे यांनी केले ओळखपत्र नूतनीकरण नवीन सदस्य नोंदणी अभियान तालुका ग्रामीण शहर मासिक बैठक व कार्यकारणी पदाधिकारी नियुक्ती संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. 

कार्यकारणीच्या विशेष बैठका विविध स्तरावरील कार्याचा आढावा अहवाल नियमितपणे अपडेट करीत जिल्हा कार्यकारणी व प्रदेश कार्यकारणी ला सादर करण्यासंदर्भात प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी विविध विषयावर मार्गदर्शन करीत उपस्थित सदस्यांना सुचित केले. बैठकीला गणेश नालमवार ,शारदाताई खोब्रागडे, महेंद्र वालदे, गणेश पेंदरे, प्रकाश पिंपळकर, मिथुन मसराम, श्रीपाद बाकरे आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत