Breaking News

16 वर्षीय विद्यार्थ्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम, भंडारा : पवनी तालुक्यातील वलनी(चौरास) येथे 10 व्या वर्गात शिकत असलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.प्राप्त माहितीनुसार मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांचे श्रेयस युवराज जीभकाटे असे नाव असून ते पत्रकार शेखर जिभकाटे यांचे पुतणे आहेत.

श्रेयस हा आपल्या मित्रासोबत वैंनगंगा नदी पात्रात आंघोळीकरिता गेला असता ही दुर्दैवी घटना घडली.श्रेयसच्या पाठीमागे आई,वडील,मोठा भाऊ आणि आप्त परिवार असून त्याच्या दुर्दैवी मृत्युने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.त्याचप्रमाणे वलनी(चौरास)गावामध्ये शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत