हिवाळी परीक्षा 2022 मध्ये राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीरची उत्तुंग भरारी
हिवाळी परीक्षा 2022 मध्ये राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीरची उत्तुंग भरारी
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, उदगीर :- जी एस पी एम द्वारा संचलित राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ तर्फे आयोजित हिवाळी परीक्षा 2022 मध्ये घवघवीत यश संपादन करीत तंत्रनिकेतनच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तंत्रनिकेतन मधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील प्रथम वर्षातील शेख नोमान 85.43% सह प्रथम आला आहे अथर्व होळसंबरे व अनिकेत देवरे या विद्यार्थ्यांनी 84.43% सह द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
तर मोरगे लक्ष्मी 84.13%, मुंडे अंजली 84.00% घेऊन तृतीय आली आहे. द्वितीय वर्षातील मुगळे किशोर 82.41%, वाघमारे सुंदरम 80 .00% , तृतीय वर्षातील जहागीर दार फाहाद ८४.६७% , वाघ ऐश्वर्या ८३.00% , शेरे सुजाता 81.00% सह प्रथम, द्वितीय, तृतीय आले आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून तृतीय वर्षातील वासुदेव आयुष विजय 79.30% , वासुदेव पियुष विजय 77.10%, मानकरी कुणाल कमलाकर 76.70% तसेच द्वितीय वर्षातून शेख लुकमान अब्दुल बासित ८४.११% राठोड सोनाली रंगराव 73.33% जाधव प्रतीक्षा 71.11% तर प्रथम वर्षातील गायकवाड गुरुनाथ शरद 70.71% सह प्रथम, द्वितीय, तृतीय आले आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील श्रीगीरे अंतेश्वर हनुमंत 73.91%, सोनवणे नयन सुजित 69.81% , तर प्रथम वर्षातील ढगे अभिषेक राजेंद्र 67.50% , नवाडे सार्थक बाळासाहेब 65.00% सह प्रथम , द्वितीय आले आहेत.
इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभागातून प्रथम वर्षातील सुवर्णकार माऊली बालाजी 72.29%, वाघमारे मोनु ,शिवाजी 67.14% , आफान महेमूद हुसेनी 67.00% , अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय आले आहेत. द्वितीय वर्षातील खटके शुभांगी 71.00% , साबणे सपना 60.00% सह प्रथम , द्वितीय आले आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कमिशन इंजीनियरिंग विभागातील प्रथम वर्षातील तेजस्विनी रमेश 66.86%सह प्रथम आली आहे. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब राठोड, सचिव अमित राठोड, प्राचार्य जाधव पी.डी., विभाग प्रमुख मानकरी के.जी., सौ .शेख पी . के. शेख वाय. एन., इंद्राळे आर. आर. प्रथम वर्षाचे प्रमुख पठाण वाय. एम. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत