Breaking News

वरोरा येथे पोलखोल चित्रप्रदर्शनीतून सरकारची पोलखोल , हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरवात

 

खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उदघाटन

 महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : हाथ से हाथ जोडो अभियाना अंतर्गत वरोरा काँग्रेसतर्फे सरकार विरोधात पोलखोल चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.या चित्रप्रदर्शनीतून विविध चित्रांचा माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. आज खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनीचे उदघाटन झाले. वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी सामान्य नागरिकांना मोदी सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात संवाद साधत हे पत्रक देण्यात आहे.  

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विलास टिपले, तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, नगरपालिकेचे माजी गटनेते गजानन मेश्राम, माजी सभापती कृ. उ. बा. स. वरोरा विशाल बदखल, माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग,मनोहर स्वामी,सुनंदा जिवतोडे माजी जि. प. सदस्य, महिला वरोरा शहर अध्यक्षा दिपाली माटे,शिरोमणी स्वामी, मीना राहटे, प्रतिमा जोगी, चंद्रकला चिमुरकर, मंगला पिंपळकर, सुनीता साळवे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल आसूटकर, निलेश भालेराव,बाळू पिसाळ, राहुल देवडे,माजी नगरसेवक सनी गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे, सचिन घाटे, बाळू चिंचोलकर, छोटूभाई शेख, प्रमोद काळे, सलीम पटेल, सुभाष दांदले, विजय पुरी, राजेंद्र बनसोड, अय्युब पठाण,आसिफ रजा, राहील पटेल,मेघशाम सिडाम, संजय घागी, शेळकी गुरुजी, अनिरुद्ध देठे, सुरज बावणे, सरपंच प्रवीण भोयर,राजु डाफ, सुरेश टेकाम, लक्ष्मण बैस, गिरीधर कष्टी, महादेव आसुटकर, गणेश काळे, शरद आसुटकर,पराग नरडे,मनिष जयस्वाल यांची उपस्थिती होती.  

 

              देशात महागाई आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे सामान्य माणसात सरकार विरोधात रोष आहे. हा रोष चित्रप्रदर्शनीतून दिसून आला. याप्रसंगी मोठ्या संख्येत वरोरा येथील नागरिकांनी या चित्रप्रदर्शनीची प्रत्यक्ष पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत