Breaking News

अंबुजा सिमेंट फाऊंडेशन तर्फे विश्व जलदिवस निमित्त जागरूकता अभियान

 अंबुजा सिमेंट फाऊंडेशन तर्फे विश्व जलदिवस निमित्त जागरूकता अभियान

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : जगात दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. भविष्यातील पाण्याची ही समस्या जगला भेडसावत आहे.म्हणून नानकपठार येथे विश्व जल दिवस निमित्त पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे तालुका समन्वयक दिपक साळवे यांनी सांगितले की माणसाने जंगल तोड केली.त्यामुळे पाण्याचे चक्र बदल झाले.माणसाने जेवढे झाडे तोडले त्यापेक्षा अर्धी पण लागवड त्यांनी केली नाही.म्हणून जंगलाचे नियोजन बिघडले त्यामुळे पाण्याचे पण नियोजन बदल झाले.

त्यामुळे माणसाला लागणाऱ्या पाण्याचे बजेट बिघडले.त्यासाठी शेतकऱ्यांनी च नाही तर सर्व नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. वरिष्ठ समाजशास्त्रज्ञ किशोर हजारे यांनी सांगितले की कोरडवाहू शेती मध्ये ओलावा टिकून राहत नाही.कारण शेतात पाणी टिकून राहत नाही.पाणी मुरत नाही.त्यासाठी पाणी मुरले पाहिजे.शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीत बदल केले पाहिजे.ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे.मुख्य पिकात आच्छादन म्हणून सोयाबीन,मुंगाचा वापर करावा त्यामुळे या पिकाचा अवशेष पडून सेंद्रिय खत होते आणि आच्छादन म्हणून उपयोग होईल.

यावेळी अमरूनाईक आश्रम शाळा, नानकपठार चा सहभाग होता.शाळेचे मुख्याध्यापक चिक्कुलवार यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात पाण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे.कार्यक्रम नंतर ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला होता ते प्रात्यक्षिक दाखविले आणि समजावून सांगितले.यावेळी सूत्र संचालन प्रक्षेत्र अधिकारी कु.प्रिया मालेकर यांनी केले तर आभार प्रक्षेत्र अधिकारी कू.प्रणिता वावरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत