आदिवासी भागातील शिवराजने पटकावले सुवर्णपदक.
आदिवासी भागातील शिवराजने पटकावले सुवर्णपदक.
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, अविनाश मुंढे, पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त्याने ता.१९ रोजी नेहरू युवा केंद्र, युवक कल्याण व क्रीडा संचालनालय भारत सरकार, आणि ऑल इंडिया तायक्वांदो फेडरेशनशी संलग्न स्टर्लिंग तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि स्टर्लिंग तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऑल इंडिया ओपन असोसिएशन नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२३ पुणे येथील मांजरी परिसरातील शिवकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाली.
या स्पर्धेत देशभरातील विविध ठिकाणांहून आलेले अनेक स्पर्धकांनी यावेळी आपला सहभाग नोंदवला होता. श्री.संत तुकाराम माध्यमिक विद्यालयातील कु.शिवराज अविनाश मुंढे याने नऊ वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक पटकवाले.शिवराज मुंढे हा जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील राजूर गावचे सुपुत्र आहेत.आदिवासी समाजाच्या वतीने शिवराजचे कौतुक करण्यात आले.शिवराजला वॉरियर स्पोर्ट्स अकॅडमी पुणे वारियर टायकोंडो ट्रेनिंग सेंटर लोहगाव पुणे , स्टर्लिंग टायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी सुधीर माने वाईस प्रेसिडेंट मुकेश वाल्मिकी यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुढील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी शिवराजची निवड झाल्याने संत तुकाराम विद्यालयाच्या प्राध्यापिका गायकवाड मॅडम व जाधव मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत