Breaking News

नगर परिषद चे मुख्यधिकारी पारदर्शक काम करून भ्रष्टाचार थांबविणार काय ?

 नगर परिषद चे मुख्यधिकारी पारदर्शक काम करून भ्रष्टाचार थांबविणार काय ?

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नावेद खान, चंद्रपूर : निविदा प्रक्रियेत चालणारा भ्रष्टाचार थांबवून पारदर्शी कारभारासाठी राज्य सरकारने ई-टेंडर प्रक्रिया आणली असली तरी अधिकारी आणि कंत्राटदारांची युती या प्रक्रियेला भगदाड पाडत असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. कमी दराने काम करण्यास तयार असलेल्या कंत्राटदारांना 'फोडून' अधिक रकमेच्या निविदा भरणारे कंत्राटदार कंत्राटे आपल्या खिशात टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय ऑफिसचे जे टेंडर काढतात दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा, अंदाज व्यक्त केला जात आहे.

असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील नगरपरिषद मध्ये होत असल्याचे निदर्शनास आले ब्रह्मपुरी येथील नगरपरिषद कार्यालयाने सहा टेंडर काढले त्यापैकी पहिल्याच क्रमांकाचे टेंडर मध्ये घोटाळा असल्याचे सूत्राची विश्वसनीय माहिती आहे. या सर्व जागेवर एकदम पक्का रस्ता आणि नालीचे बांधकाम आधीच आहे तरीही नगरपरिषद काढून त्या रस्त्याची सुधारणा करत आहेत ज्याची आवश्यकताच नाही. 3941411 रुपये इतकी रक्कम असणारे पहिले टेंडर ज्यात प्रभाग क्रमांक तीन मध्ये कलाम शेख यांचे घरापासून ते जावेद खान पठाण यांच्या घरामागे आरसीसी नाली बांधकाम करणे व पेविंग ब्लॉक बसवणे. रियाज मोहम्मद शेख यांच्या घरापासून ते मोहम्मद शकीर पटेल यांच्या घरापर्यंत आरसीसी नाली बांधकाम करणे व पेविंग ब्लॉक बसविणे.

 अकबर अमीन पठाण यांचे घरापासून ते रोशनी शेख यांच्या घरापर्यंत आरसीसी नाली बांधकाम करणे व पेविंग ब्लॉक बसवणे. इकबाल पठाण यांची घरापासून ते पब्लिक टॉयलेट पर्यंत आणि परवेश पठाण यांच्या घरापासून इजाज पठाण यांच्या घरापर्यंत ते सदिक्षक यांच्या घरापर्यंत आरसीसी नानी बांधकाम करणे व पेविंग ब्लॉक बसवणे. प्रभाग क्रमांक सात मधील फिदा अली शेख यांचे घरापासून ते आदित शेख यांचे घरापर्यंत आरसीसी नाली व सीसी रोडचे बांधकाम करणे प्रभाग क्रमांक तीन मधील महात्मा गांधी पुतळ्यासमोरील दर्गांमध्ये शेड बांधकाम व इतर आवश्यक कामे करणे. अशा प्रकारचे खोटे टेंडर काढून कंत्राटदार आणि अधिकारी सरकारच्या ई टेंडर प्रक्रियेला भागदळ पाडत असल्याची चर्चा संपूर्ण ब्रह्मपुरी मध्ये चालू आहे.

ब्रह्मपुरी नगरपरिषद मुख्याधिकारी तर्फे दिनांक 07/02/2023 रोजी निविदा सूचनेमध्ये सहा टेंडरची सूचना देण्यात आली, पण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर पाहणी केली असता, अर्धवट माहिती सादर केली दिसून येत आहे. यामध्ये कामाचे एस्टिमेट टाकण्यात आले नाही. ई टेंडर प्रणाली कुठलाही घोळ होऊ नये यासाठी काढलेली प्रक्रिया होती पण सरकारच्या या पारदर्शी प्रक्रियेला सुद्धा भागदड पाडण्यात अधिकारी व कंत्राटदार यांनी मिळून कुठलीही कसर सोडलेली नाही. 

कोणत्याही कामाचे ई-निविदा कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावणे अनिवार्य असते पण इथे तसं होत नाही नगरपरिषद बांधकाम विभागाचे अधिकारी यांना कामाचे इस्टिमेट मागण्याकरिता गेले असता तानाशाही करत त्यांनी ई-निविदा देण्यास नकार दिला, आणि कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर माहिती लावलेली नाही, याची माहिती मुख्य अधिकारी यांना दिली होती पण त्यांनी सुद्धा आपला काम पारदर्शक प्रमाणे केलेले दिसून येत नाही.

ई निविदा मध्ये ज्या आरसीसी नाली बांधकामाचा उल्लेख केला आहे त्या जागेवर पक्क्या नाल्यावर सिमेंट रोड आधीपासून बनले आहेत, ब्रह्मपुरी नगर परिषदेतर्फे 07/02/2023 रोजी काढण्यात आलेल्या सहा टेंडरची शासकीय तपासणी करून टेंडर रद्द करण्यात यावे, आणि पुन्हा शासकीय नियमानुसार पारदर्शकता पूर्वक टेंडर काढण्यात यावे.असे निवेदन आम आदमी पार्टी, ब्रम्हपुरी तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत