Breaking News

कच्चेपार परिसरात फिरतोय भुकेला वाघ हल्ल्यात गुराखी ठार बैलाचाही घेतला घास

 कच्चेपार परिसरात फिरतोय भुकेला वाघ हल्ल्यात गुराखी ठार बैलाचाही घेतला घास

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाडी येथून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्चेपार परिसरात एक पत्तेदार भुकेला वाघ फिरत आहे. गुरुवारी सायंकाळी वाघाने गुराखी बाबुराव देवतळे यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना उपचाराकरिता नेतांना वाटतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच रात्री वाघाने कच्चेपार येथील गोठ्यातील बैलावर हल्ला करून ठार केले. एकाच दिवशी गावात घडलेल्या या दोन घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. कच्चेपार हे गाव चहूबाजूने जंगल व्यक्त आहे, गुरुवारी कक्ष क्रमांक 147 मध्ये गुरे ढोरे चारून परतताना गुराखी बाबुराव लक्ष्मण देवतळे वय 56 यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना वाटतच त्यांचा मृत्यू झाला. त्याच रात्री कच्चेपार गावातील नरेंद्र नानाजी पिपरे यांच्या घराच्या गोठ्यात बांधून असलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भेटीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे या घटना क्रमांची गांभीर्याने दखल घेऊन वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा व आपण ग्रस्तांना योग्य आर्थिक मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

गोठ्यात बांधलेल्या गाईवर हल्ला, गाय ठार वासरू जखमी

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ जवळील मौजा चालबर्डी येथील शेत सर्वे नंबर 147/1 मधील जनावरांच्या गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला, यात एका गाईचा मृत्यू झाला, तर एक वासरू जखमी झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली यात गाय मालकाचे जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले, ही गाय गरोदर असल्याने वन विभागाकडे तक्रारीतून नमूद केले आहे. शालिनी खुशाल धानोरकर असे गाय मालकाचे नाव असून, मौजा चालबर्डी शेत शिवारातील गोठ्यात इतर पाळीव प्राण्यांसोबत गाईला बांधून ठेवण्यात आले होते. शुक्रवारच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास अचानक एका पट्टेदार वाघाने गोठ्यात प्रवेश करून त्यांच्या गाईवर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला एका वासरावरही वाघाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची तक्रार भद्रावतीच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात केली आहे. वन विभागाने पंचनामा केला असून वनपरिक्षेत्र अधिकारी एचपी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत