काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, विद्यार्थी ट्रॅक्टरने चालले होते आणि...
काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, विद्यार्थी ट्रॅक्टरने चालले होते आणि...
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, अमरावती : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात अमरावतीत झाला. शिबीर आटोपून विद्यार्थी ट्रॅक्टरने चालले होते. त्यावेळी या वळणावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि 22 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. जैनापूर इथं जे डी पाटील सांगळदकर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचं आयोजन केलं होते. श्रमसंस्कार शिबीर आटोपून विद्यार्थी ट्रॅक्टरमधून दर्यापूरला जात होते. वळणावर ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. या अपघातात 22 जण जखमी झालेत. त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
धक्कादायकबाब म्हणजे चक्क ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात आली. ट्रॅक्टरच्या ट्रोलीत खचाखच विद्यार्थी भरण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थी ट्रॅक्टरमध्ये असतानाही ट्रॅक्टर चालक वेगाने चालला होता. वळण असतानाही ट्रॅक्टरचा वेग कमी केला नाही. त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि विद्यार्थी जखमी झालेत. या निष्काळजीपणा कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शिबीर भरविण्यात आले होते. मग विद्यार्थ्यांनीची जबाबदारी कोण घेणार,अशी संतप्त प्रतिक्रिया पालक आणि नागरिकांतून विचारण्यात येत आहे.
या ट्रॅक्टरच्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला असून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छोट्या वळण रस्त्यावर हा ट्रॅक्टर वेगाने जात असताना ट्रॅक्टरला अपघात झाला. या अपघातात 22 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून या अपघातातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत