Breaking News

ऐकावे ते नवलच ! चिमूर तालुक्यातील धक्कादायक घटना

 मासोळीने चक्क शेपटी मारल्यामुळे मासेमाऱ्याचा गेला जीव

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चिमूर : आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सातारा येथील तुकाराम कोडापे वय 70 हे अनेक वर्षापासून मच्छीमारी करून, आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत आहेत. मात्र हयात भर रोजी रोटी देणाऱ्या मच्छीनेच खोडापे यांचा घात केला मासेमारी करताना मोठ्या मासोळीने तुकाराम कुडापे यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला यात त्यांचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारास घडली.

चिमूर तालुक्यातील सातारा येथील वाल्मिकी मच्छीमार संस्थेचे सदस्य तुकाराम कोळपे गावाशेजारी आलेल्या टेकेपार येथील मामा तलावात नेहमीप्रमाणे सहकार्यांसोबत मच्छीमारीसाठी गेले नेहमीप्रमाणे तुकाराम व सहकारी मच्छी पकडण्यासाठी तलावात उतरले दरम्यान मच्छीमारी करत असताना मोठ्या मासोळीने तुकाराम यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला.

 छाती दुखत असल्याने सहकार्याने तुकाराम यांना तलावाच्या काठावरील त्यांच्या झोपडीत आणून छातीला बाम लावून दिला मात्र काही वेळातच त्यांनी हालचाल बंद केली पोलीस पाटील यांच्या मदतीने चिमूर पोलिसांना कळविण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी येऊन तुकाराम यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचा तपास ठाणेदार मनोज गबने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत