Breaking News

अश्विनी इरोळे यांना रणरागिनी नॅशनल अवार्ड जाहीर.

 अश्विनी इरोळे यांना रणरागिनी नॅशनल अवार्ड जाहीर.

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पुणे : वेद फाउंडेशनच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई मोराळे या वेद फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना "रणरागिनी नॅशनल अवॉर्ड" ने सन्मानित करत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त हा अवॉर्ड देण्यात येणार असून कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट शिरूर , अश्वयुग महिला मंच च्या संचालिका अभिनेत्री, कोरिओग्राफर अश्विनी भाऊसाहेब इरोळे यांना यावर्षीचा "रणरागिनी नॅशनल अवार्ड" हा वेध फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. स्वातीताई मोराळे यांनी जाहीर केला आहे. हा पुरस्काराचा कार्यक्रम दिनांक 12 मार्च रोजी जाधव इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हॉल, नऱ्हे ,सिंहगड रोड पुणे. येथे संपन्न होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत