वाघाच्या हल्ल्यात इसम ठार :- आप तर्फे श्रद्धांजली
वाघाच्या हल्ल्यात इसम ठार :- आप तर्फे श्रद्धांजली
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : आम आदमी पार्टी चे युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे यांचे बंधू पुरुषोत्तम बोपचे (40) राह इंदिरानगर यांचा चंद्रपूर – मुल मार्गावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या लोहराच्या जंगलात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात ठार झाले .
ही घटना दिनांक 28/4/2023 शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. इंदिरा नगर येथील रहिवासी असलेला पुरुषोत्तम स्थानिक एम ई एल पोलाद कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी पुरुषोत्तम लोहारा जंगलात फुले वेचण्यासाठी गेला होता. दुपार झाली तरी घरी परत आला नाही म्हणून त्यांचा पत्नीने घरा शेजार च्या ना घेऊन शोध घेतला. शोध घेत जंगलात येऊन बघितले असता त्याचा मृतदेह मिळाला. या घटनेने आप परिवारात शोकाकुल पसरला असून आप चंद्रपूर तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत